शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज ‘मातोश्री’ येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याविषयी बोलताना पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माहिती देताना अनेक विषयांवर चर्चा झाली असं म्हणू शकतो. पण त्या चर्चा काय आहेत बंद दाराआड झाल्या. अराजकीय चर्चा झाल्या. सध्या बिहार जरी राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र बिंदू झालं असलं तरी चर्चा अराजकीय झाल्या’, असं सांगितलं. देवेशचंद्र ठाकूर यांनी सांगितलं की, ‘माझं शिक्षण महाराष्ट्रात झालं आहे. त्यांनी मराठीत भेटीची माहिती दिली. ते म्हणाले मी बिहारमध्ये पदवीधर संघाचा आमदार आहे. माझी सर्वांची जूनी ओळख आहे. मी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो.

यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा मुद्दा सध्या गाजतो आहे. त्यावर बोलताना, ‘मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं याचा निर्णय घेण्याचा, बदल करण्याचा पक्षाच्या अध्यक्षाला अधिकार असतो. अध्यक्षपदाच्या निर्णयापर्यंत अजून कोणी आलेलं नाही. तो निर्णय आधी होऊ द्या, मग मला काय बोलायचं ते बोलेन. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडीला तडा जाईल, अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडेल, असं वाटत नाही, अशा भावना उद्धव ठाकरे अत्यंत स्पष्ट शब्दात मांडल्या.

शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील गोष्टींवरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ‘प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. मला इतकंच म्हणावसं वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य वाटतो. मला असं वाटतं की याच्या पलिकडे मी यावर काही बोलणं योग्य नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’

पवारांनी आपल्या आत्मचरित्रात दिल्लीतील नेत्यांच्या मनात मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा विचार नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत ठाम शब्दात उत्तर दिलं. ‘मी माझ्या मतांवर ठाम आहे. माझी मतं मी ठामपणे मांडली आहेत, मांडणार आहे. तूर्त महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही, याची मी काळजी घेईन’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकांच्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना, मी मोदींचा पराभव नाही.. मी व्यक्तीचा पराभव कधीच करायला मागत नाही, मी वृत्तीचा पराभव करायला मागतो. म्हणूनच हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व पक्षांनीच नाही तर जनतेने एकत्र आलं पाहिजे अशी माझी धारणा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

मी पवारांना सल्ला कसा काय देणार?

शरद पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याच्या घोषणे नंतर आपला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच उद्या त्यांच्या पक्षात निर्णय होणार आहे. त्यांना अधिकार आहे त्यांच्या मनाप्रमाणे करण्याचा कार्यकर्त्यांचा देखील आपल्या नेत्यावर तेवढाच अधिकार असतो जसा नेत्याचा कार्यकर्त्यावर असतो. त्याच्यामुळे ते सगळ्यांच्या हिताचा निर्णय ते घेतील. मी त्यांना सल्ला कसा देणार आणि मी दिलेला सल्ला पचनी नाही पडला तर काय करणार, असंही ते म्हणाले.

जय भवानी जय शिवाजी म्हणून मराठी द्वेष्ट्यांना हरवा !

बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता कारण त्यांनी हिंदुत्त्वाचा प्रचार केला म्हणून. आता कारण नसताना कर्नाटक निवडणुकीत मग तो बजरंग दलाच्या निमित्तानं असेल किंवा आणखी कोणत्याही निमित्तानं असेल, मोदीजी म्हणाले की बजरंगबली की जय असं बोलून तुम्ही मतदान करा. मग माननीय पंतप्रधान असं बोलले असतील याचा अर्थ निवडणूक कायद्यात बदल झाला असेल असं मी मानतो. कारण त्यावेळी हिंदुत्त्वाचा प्रचार केला म्हणून हिंदुहृदयसम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता. ते निवडणूक तर कधी लढले नव्हते. लढणार नव्हते. पण त्यांना बंदी केली होती. पण ज्याअर्थी पंतप्रधान तिथल्या मतदारांना बजरंगबली की जय असं बोलून मतदान करा असं सांगत असतील तर मग मी तिथल्या कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आणि मराठी माता भगिनींना सांगतो की कोणतंही सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतो आहे, तर तुम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून आपल्या मराठी माणसाचं एकीकरण, एकता, एकजुटीला जपणाऱ्याच उमेदवारालाच मतदान करा. जेणेकरून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येतील. कालच संजय राऊत तिथे जाऊन आले. तेव्हा तमाम मराठी जनतेला मी आवाहन करतो, की तुम्ही पाहिजे तर जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा पण मराठी माणसाची एकजूट तुटूफूटू देऊ नका. त्या एकजुटीची वज्रमूठ दाखवून द्या’, असं आवाहन त्यांनी केलं.

अधिक वाचा  राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईच कमाई; मालवाहतूक 146 दशलक्ष टनांवर, असा झाला फायदा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या बेळगावातील भाजपच्या सभेवेळी महाराष्ट्र एकीकरण समीतीने काळे झेंडे दाखवत निदर्शन केली. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांना एकीकरण समीतीच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं योग्य असल्याचं सांगितलं. एक-दोन वर्षांपूर्वी बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला होता, महापालिकेतील छत्रपती शिवरायांचा भगवा उतरवला होता. त्याच्यामुळे जय बजरंबली चांगलंच आहे, पण जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करून मराठी द्वेष्ट्यांना हरवा, असं आवाहन त्यांनी केलं.

स्वतःचं बळ दाखवा!

बजरंग बली हे आपलेच आहेत. पण कर्नाटकातील प्रचारात बजरंग दल किंवा बजरंग बलीची चर्चा व्हायला नको होती. लोकांच्या हिताची चर्चा होणं अधिक आवश्यक होतं. काँग्रेसनेही बजरंग दलाची गोष्ट आणायला नको होती. तसंच पंतप्रधान मोदींनी देखील त्यावर हे बोलण्याची आवश्यकता नव्हती. बजरंगबली तर बलवान होतेच. आपल्या बळाचं काय? मग ते काँग्रेस असो वा भाजप; स्वतःचं बळ दाखवा ना आणि त्या बळाचा वापर केवळ मराठी भाषिकांवर केला जात असेल तर त्यांचा पराभव आम्हाला करायलाच हवा, असं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  बीड जिल्हा रुग्णालयात भयंकर परिस्थिती, प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय धडपड?

सभांच्या कार्यक्रमावर बोलताना ते म्हणाले की, सभांचा कार्यक्रम आम्हीच ठरवला होता. त्याच्यात मीच पुढाकार घेतला होता. मात्र उष्माघाताच्या प्रकरणानंतर आम्ही त्या मे नंतर घेण्यावर विचार करत आहोत, असंही ते म्हणाले.

माझ्यावर उपन्यांच्या सुपाऱ्या घेऊन हल्ला का?

रिफायनरी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, रिफायनरीमुळे महाराष्ट्रत प्रदूषण हे मला परवडणारे नाही. त्यामुळे मी तेव्हाच म्हटलं होतं की हा प्रकल्प ज्याला जिथे कुठे न्यायचा असेल त्याने घेऊन जावा, असं माझं मत होतं. पण आमचं सरकार पडल्यानंतर महत्त्वाचे मोठे सगळे प्रकल्प यांनी गुजरातकडे फिरवले, म्हणून मी नाणारच्या वेळेला बोललो तेच माझं मत आजही ठाम आहे की, माझं पत्र घेऊन आज तुम्ही नाचवता आहेत तर माझ्याच काळामध्ये येऊ घातलेले प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? म्हणजे महाराष्ट्राकडे राख आणि गुजरातकडे रांगोळी असं मी समजायचं का? असं जर असेल तर लोकांची बाजू घेऊन प्रकल्पाला विरोध करा. नाहीतर प्रकल्प चांगला असेल तर मी ठरवलं होतं तसं स्थानिकांना विचारा. त्यांच्याशी चर्चा करा. त्यांना हवे असेल तर ठेवा नको असेल तर रद्द करा. तिथल्या जमीनी उपयांनी घेतल्या आहेत. मग त्यांच्या सुपाऱ्या घेऊन माझ्यावर येता आहात का? माझ्या भूमिपुत्रांवरती तुम्ही उपऱ्यांचा वरवंटा फिरवत आहात का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.