पुणे : भारतीय वंशाचे व पुणे शहरात जन्म झालेले अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ असलेले अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष झाले आहे. अजय बंगा यांचे महाराष्ट्राशी आणि पुण्याशी नाते आहे. त्याबद्दल आता पुणेकरांना अभिमान वाटणार आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती.

जागतिक बँकेचे १४ वे अध्यक्ष

अजय बंगा जागतिक बँकेचे १४ अध्यक्ष असतील. २ जून २०२३ रोजी ते आपला पदभार स्वीकारणार आहे. पुढील पाच वर्षे ते या पदावर कायम राहणार आहेत. विद्यामान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची ते जागा घेणार आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी बंगा यांना जर्मनी, जपान फ्रांस, इटली, बांगलादेश, कोलंबिया, घाना, केनिया, सऊदी अरब, कोरिया गणराज्य आणि संयुक्त राष्ट्रचा पाठिंबा मिळाला.

अधिक वाचा  महाराष्ट्रात शहांच्या प्लानवर काम सुरु भाजपनं गियर बदलला; दोन्ही DCMचे होमग्राऊंड ताब्यात घेण्यासाठी टीम देवेंद्रचे शिलेदार सक्रिय

हे असणार आव्हान

जागतिक बँकेचे मुख्य कार्य म्हणजे विकास प्रकल्प आणि लोककल्याणकारी कामे वाढवणे आहे. जगाने नुकतेच कोरोना महामारीशी लढा दिला. यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. अनेक देश कर्जाच्या सापळ्यात अडकले. या परिस्थितीत जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून अजय बंगा यांच्यासमोर कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या आर्थिक गरजा संतुलित करण्याचे मोठे आव्हान असेल.

बंगा यांचा जन्म पुण्यात

६३ वर्षीय बंगा यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला. त्यांचे वडील हभजनसिंग बंगा भारतीय लष्करात होते. ते लेफ्टनंट जनरल पदावरुन निवृत्त झाले. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते, त्यावेळी अजय यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ कुटंब पंजाबमधील जालंधरचे आहे. शालेय शिक्षणानंतर अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी IIM अहमदाबादमधून एमबीए केले.

अधिक वाचा  IPL 2025 मध्ये मॅच फिक्सिंगसाठी प्रयत्न, खेळाडूंना दिली जात आहेत आमिषं, कोण आहे मास्टरमाइंड?

३० वर्षांचा अनुभव

जागतिक बँकेनं हवामान बदलाबाबत ठोस पावलं उचलावी, यासाठीचा पाठपुरावा अमेरिका सातत्यानं करत आहे. त्याचवेळी अजय बंगा यांचं नाव अमेरिकेनं सूचवले आहे. त्यांनी दशकभराहून अधिक काळ मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व केलं. ते सध्या एका खासगी इक्विटीमध्ये काम करत आहेत. यापुर्वी सिटीग्रुपच्या अशिया-पॅसिपिक रिजनचे सीईओ होते.

नेस्लेमधून केली सुरुवात

1996 मध्ये सिटीग्रुपमध्ये जाण्यापुर्वी बंगा 1981 मध्ये नेस्ले कंपनीतून आपल्या करियरची सुरुवात केली. भारतात त्यांनी 13 वर्षे काम केले. पेप्सिकोमध्ये दोन वर्ष त्यांनी काम केले. त्याचबरोबर अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स व Dow Inc.मध्येही त्यांनी काम केले. त्यांना सामाजिक विकास विषयात रुची आहे.

अधिक वाचा  तुझी ही जागा नाहीय…,मैदानात जसप्रीत बुमराह भिडला; सामना संपताच करुण नायर म्हणाला…

बाराक ओबामासोबत केले काम

2015 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर त्यांनी काम केले. व्यापार धोरणासंदर्भात ते त्यांचे सल्लागार होते. जागतिक बँक जगभरातील 189 देशांचे नेतृत्व करते. बँकेच्या उद्देश जगभरातील गरिबीचे निर्मूलन करणे हा आहे.