महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या यांच्या मार्फत मित्रवर्य कै.दिगंबर उर्फ दिगुभाऊ यांच्या स्मरणार्थ शिवतीर्थ पाणपोईचे सोमवार १ मे महाराष्ट्र दिन रोजी छ.संभाजी उद्यान समोर, जंगली महाराज रोड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक मनसे नेते मा.राजेंद्र वागस्कर व मा.साईनाथ बाबर मनसे शहर अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाढता उन्हाळा गर्मीमुळे त्रस्त झालेल्या सर्व सामान्य नागरिकांना स्वच्छ, निर्मळ व थंड पाणी पिण्याची सोय म्हणून करण्यात आले.

या प्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा सौ.वनिताताई वागस्कर, जेष्ठ मार्गदर्शक श्री.विष्णू ( तात्या ) मारणे,रविंद्र भोसले, नरेंद्र तांबोळी , प्रकाश पवार, सुनिल कदम, सचिन पवार,रुपेश घोलप,अमेय बलकवडे ,केतन डोंगरे ,प्रदिप खळदकर, सुदिन जयप्पा हेल्प रायडर ,बाळासाहेब ढमाले ,संदिप कुदळे अतुल भारती ,अभिजीत मेश्राम, आदी मान्यवर व हेल्प राईडर सदस्य आणि वॅाल्स ग्रृप चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी ‘बौद्ध भन्तेंकडून बुद्ध वंदना आणि धम्मदेसना’ अभिवादनासाठी उसळला जनसागर

प्रशांत कनोजिया प्रमुख संघटक मनविसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.