मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. राज्याच्या राजकारणात मागील दोन-तीन दिवसांपासून घडामोडींना वेग आल्याने मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे राजकीय अर्थाने बघितलं जात आहे. मुख्यमंत्री राज्यबाल बैस यांच्या भेटीला राजभवनात दाखल झाले आहेत. या भेटीचं कारण अस्पष्ट आहे. दोघांमध्ये महत्वाची बैठक होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात सुरु असलेलं राजकारणावर चर्चा होऊ शकते. दरम्यान, राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बैठक पूर्वनियोजित नव्हती. मुख्यमंत्री अचनाक राजभवनावर गेल्याची माहिती असून ही भेट स्नेहभोजनानिमित्त असल्याचंही बोललं जातंय.

मुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीचा नेमका अर्थ काय? नेमकं आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला का गेले? याचे निरनिराळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे मागच्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळ्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पक्षातलं महत्त्व अधोरेखित करणं, अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना खिळ लावणे यासह बरेच अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे आज अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय उलथापालथ होऊ शकते, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही भेट आधीच ठरल्याचं शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  शिवडी विभागाच्या वतीने भीममहोत्सव-२०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न