मॉडर्न विकास मंडळ, पुणे ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त सलग ३२ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन अमेय हॉल, शिवतीर्थनगर, कोथरुड येथे करण्यात आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन मा. मुरलीधरजी मोहोळ (मा. महापौर- सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश), मा. राजेशजी पांडे (संघटन सरचिटणीस, पुणे शहर भाजपा ), मा. सुधीरजी जवळेकर कोषाध्यक्ष, सेवा भारती महाराष्ट्र प्रांत, मा. सिताराम खाडे (प्रांत संघटक, पतित पावन संघटना) यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये १६२ रक्तदात्यानी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी मधुकर शिंदे मामा, दिलीप घोलप, कमलाकर भोंडे, दत्ता भगत, बळीराम भडकवाड, योगेश मराठे, मनिष कदम, गोरख जोरी, विलास करंदीकर, गणेश भडकवाड, सुयश ढवळे, रामदास महाडीक, पांडुरंग शिंदे, आकाश मालपोटे, सौ. निता घोलप, सौ. निर्मला रायरीकर व मंगेश कदम यांनी सहकार्य केले.
सर्व रक्तदात्याचे स्वागत सौ. मनीषा बुटाला व सुयश बुटाला यांनी केले. डॉ. संदीप बुटाला यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.