गुहागर दि. २ (अधिराज्य) पूर्व प्राथमिक जिल्हा परिषद शाळा मुंढर नं.१ आणि अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा ७५ वा अमृत महोत्सव २०२३ हा कार्यक्रम अमृत महोत्सव कमिटी अध्यक्ष मा. प्रभाकर रामचंद्र शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर प्रसंगी पराग कदम सर व संदीप शिर्के सर यांनी अत्यंत उत्साहपूर्ण सुत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली, तसेच अमृत महोत्सव कमिटी सचिव प्रा. प्रकाश अनंत शिर्के कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश, संकल्पना सांगत सदर कार्यक्रमाचा प्रस्ताव मुख्याध्यापिका धनश्री पेटकर मॅडम यांनी कसा मांडला व त्याकरता ग्रामस्थांनी दिलेली साथ याबाबत आढावा घेत, तसेच शाळेच्या विकासाबाबत आपले मत व्यक्त करत कार्यक्रमाचा लेखाजोखा व प्रास्ताविक सादर केले.प्रमुख पाहुणे या नात्याने माध्यमिक शिक्षण अधिकारी कोल्हापूर मा. श्री. एकनाथजी आंबोवकर साहेब आपले विचार मांडत असताना म्हणाले “शिक्षकांच्या बदल्या होऊ नये म्हणून शासन विचाराधीन आहे जर त्याबाबतचा GR लवकरच आला तर प्रत्येक शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल व आपल्या शाळेच्या पटावर कमी असलेला एक शिक्षक नवीन भरतीत आपल्याला मिळेल” असे प्रतिपादन केले सोबतच ते गावचे सुपुत्र तसेच माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यानी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपली शाळा जिल्ह्यात पहिली यायला हवी असेल तर अमृत महोत्सव कमिटी आणि शाळा व्यवस्थापन कमिटी यांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जातीने लक्ष दिले पाहिजे अशी सूचना वजा विनंती केली, त्यानंतर गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती गुहागर श्रीमती लीना भागवत मॅडम यांनी “जिल्ह्यात गुहागर तालुका शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कसा पुढे आहे आणि अजूनही त्याचा गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून गुहागर तालुका यशाच्या शिखरावर कसा पोहोचेल याबाबत आमच्या उपाययोजना सुरू आहेत” असे मनोगत आपल्या शुभेच्छापर भाषणात व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाची सुरवात ज्ञानज्योती अर्थात पुस्तकदिंडीने झाली सदर दिंडी शाळा ते बौद्धवाडी एस.टी. स्टँड ते आगारवाडी स्टॉप ते शाळा अशी ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात काढण्यात आली.पाहुण्यांचे स्वागत सभा अध्यक्ष आणि अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष मा. प्रभाकर भाई शिर्के यांनी केले, विशेष सत्कार, जेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणारे माजी विद्यार्थी, माजी शिक्षकवृंद, देणगीदार, उद्योजक, आदर्श नागरिक, पाहुणे या सर्वांना शाल, पुष्प व स्मृतिचिन्ह देईन गौरविण्यात आले; सदर प्रसंगी मुख्याध्यापिका पेटकर मॅडम, कुंभार गुरुजी, प्रा. प्रकाश अनंत शिंदे आदींनी आपले विचार मांडले, तसेच शाळेच्या बालकलाकारांनी कला आविष्कार, नृत्य-नाट्य, गायन माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्यावेळी सूत्रसंचालन पोलीस पाटील निलेश गमरे यांनी केले, सदर सांस्कृतिक कार्यक्रमास श्वेता बायीत मॅडम आणि रुपाली गावडे मॅडम यांनी मोठं योगदान लाभल.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे नागरिक, सरपंच प्रदीप अवेरे, उपसरपंच रामाने मॅडम, दर्शन कदम गुरुजी, रेश्मा राऊत मॅडम, पेटकर मॅडम, सचिव प्रकाश अनंत शिर्के, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश शिर्के, सहसचिव निलेश लक्ष्मण गमरे, खजिनदार विनायक लांजेकर, महेश आग्रे, अनिल जाधव, सचिन चाळके, प्रमोद शिर्के, विजय शिर्के, प्रदीप कुमार शिर्के, सुधाकर शिर्के, सुरेश शेठ गांधी आणि परिवार त्याचबरोबर अमृत महोत्सव कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी केंद्र, कर्मचारी, डेकोरेटर आदींनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल अमृत महोत्सव कमिटीचे सचिव निलेश गमरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम अध्यक्ष प्रभाकर भाई शिर्के यांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता केली.