शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. जयंत पाटलांनी NCP प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केलानंतर नेत्यांसह कार्यकर्ते निराश झाल्याचं दिसून येत होतं. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या राजीनामा सत्रानंतर हा गोंधळ अधिक वाढल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी अचानक अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानं कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नव्या अध्यक्षांच्या नावाबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादींच्या नेत्यांची नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत.

अधिक वाचा  जयंत पाटलांना दे धक्का, भाऊच भाजपात; राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मोठ्या नेत्यांचीही बीजेपीत एंट्री

थोड्याच वेळात बैठक

दरम्यान थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या समितीच्या बैठकीला सुरुवात होणार या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादींच्या नेत्यांची नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. मात्र या नावांमध्ये कुठेही अजित पवारांच्या नावाचा समावेश नाहीये.