मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद अचानक सोडल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. पण राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पवार कुटुंबियांकडून थेट घोषीत केला जाणार नाही, तर यासाठी नेमलेली समिती याबाबत निर्णय घेणार आहे. पण शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

शरद पवार आज काय निर्णय घेणार? वायबी सेंटरकडे रवाना, घडामोडींना वेग
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांकडूनही कळतं आहे. त्यामुळं आता आजच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. सध्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही सुरु आहे.

अधिक वाचा  आता धर्मादाय रुग्णालयात रुग्णांवर होणार मोफत उपचार?; मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले की…
शरद पवारांनी पद सोडल्यानंतर नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन चार नावं प्रामुख्यानं घेतली जात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. पण यामध्ये सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात आहे. कारण त्यांचा देशपातळीवरील इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क तसेच संवादही चांगला आहे.

सुप्रिया सुळे शरद पवारांपेक्षा चांगलं काम करतील – विद्या चव्हाण

सुप्रिया सुळे गेल्या १५ वर्षे खासदार आहेत. खासदार म्हणून त्यांनी खूपच चांगलं काम केलेलं आहे. त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं चांगलं बाळकडू मिळालं आहे. त्या एकदम राजकारणात आलेल्या नाहीत. त्यांनी आधी यशस्विनी नावाचं संघटन उभं करुन महिला सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे. त्यामुळं निश्चितच शरद पवारांपेक्षा चांगलं काम करण्याची क्षमता सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आहे. पक्षाचा कारभार ते चांगल्याप्रकारे सांभाळतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातही आपण हे बघितलं आहे, कार्यकर्त्यांच सुखदुःख जाणून घेणं. यामुळं त्यांच्या नावाला पसंती असणारच यात दुमत असण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

अधिक वाचा  बारामती क्रांतिकारक ‘एआय’ संशोधन एलॉन मस्क यांची दखल; नव्या तंत्राचा देशभर प्रयोग: केंद्रीय कृषिमंत्री चौहान