भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी वाढू होऊ शकते. शमीची पत्नी हसीन जहाँने शमीच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हसीन जहाँने तिच्या याचिकेत कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. यामध्ये शमीविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. शमीची पत्नी हसीनने आता त्याच्या अटकेसाठी सुप्रीम कोर्टाचं दारं ठोठावलं आहे.

मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ?
शमीच्या पत्नीने कोर्टात याचिका दाखल केली आहे. पत्नी हसीन जहाँने शमीवर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांनुसार, शमीचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो हुंड्यासाठी तिचा छळही करायचा. हसीन जहाँने याचिकेत म्हटलंय की, कायद्यानुसार कोणत्याही सेलिब्रिटीला विशेष स्थान मिळू नये. न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे.

अधिक वाचा  पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या देशी झाडांची लागवड व्हावी ; प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

शमीच्या अटकेसाठी पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव
मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. जानेवारीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला पत्नीला दरमहा 1.30 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. तर पत्नीने 10 लाखांची मागणी केली होती. यादरम्यान शमीच्या अटकेलाही स्थगिती देण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या हसीन जहाँने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती
या प्रकरणात, अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 29 ऑगस्ट 2019 रोजी शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. शमीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यावेळी न्यायालयाने अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय दिला. यानंतर हसीन जहाँने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयानेही अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. आता हसीनने सर्वोच्च न्यायायलात धाव घेतली आहे.

अधिक वाचा  ब्लिंकइट, झेप्टो तुम्हाला सांगेल देशातील महागाईची स्थिती, सरकारने आखली ही योजना

अटक वॉरंटवरील स्थगितीचा सर्वोच्च न्यायालयात आव्हान
जानेवारी 2023 मध्ये शमीला मोठा झटका देत कोलकाता हायकोर्टाने हसीनला दरमहा 1.30 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी 80 हजार त्यांच्या मुलीसाठी आणि 50 हजार त्याची पूर्वाश्रमी पत्नी हसीन जहाँसाठी खर्च करणार आहेत. मात्र, या रकमेवर हसीन खूश नव्हती. तिने 10 लाख रुपयांची मागणी केली होती.