महाविकासघडीची वज्रमूठ सभा हि खूप ताकदीची आणि कमालीची झाली असल्याने भाजपाची जळफळाट झाली आहे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. सभेला जमलेल्या अमाप जनसद्याकडे बघून भाजपची आणि सत्ताधाऱ्यांची पाय खालची जमीन घसरली आहे.

महाविकासघडीची वज्रमूठ सभा हि खूप ताकदीची आणि कमालीची झाली असल्याने भाजपाची जळफळाट झाली आहे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. सभेला जमलेल्या अमाप जनसद्याकडे बघून भाजपची आणि सत्ताधाऱ्यांची पाय खालची जमीन घसरली आहे. त्यांना काही अंशी भीती वाटत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच छोटे मैदान घेतल्यामुळे हि गर्दी जास्त वाटत होती असे म्हणणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक बसली आहे. बीकेसी मैदानावर घेतलेली सभा ही ,एकीची आणि ऐक्याची सभा होती. व्यासपीठावर महाविकासघडीच्या नेत्यांनी हजेरी दर्शवली होती. हिसका तुम्ही पाहिला असेल. कसब्याची निवडणूक, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा अंधेरीची निवडणूक असेल मविआच्या वज्रमुठीच्या ताकदीनं विजय मिळाला आहे. बारसू महाराष्ट्रातील भाग आहे. तिथं बोलणार आहे. बारसूमध्ये ६ मे रोजी सकाळी जाणार नंतर महाडला सभा घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

राज्यकर्ते देशाचा इतिहास बदलत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी ईडी सीबीआयवाले पोहोचत आहेत. ईडीवाले चीनला पाठवून बघा परत येतात का, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.२०१४ साली अच्छे दिन येणार म्हणून सांगितलं होत आले का अच्छे दिन, हजारो किंवा कोट्यवधी नोकऱ्या देणार होते मिळाल्या का नोकऱ्या, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना मराठी भाषा सक्तीची केली होती. गद्दारी करुन सरकार पाडलं आणि तो निर्णय मागं घेतला, कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना केला.

अधिक वाचा  IPL 2025 मध्ये मॅच फिक्सिंगसाठी प्रयत्न, खेळाडूंना दिली जात आहेत आमिषं, कोण आहे मास्टरमाइंड?

ती एवढीशी सभा म्हणत असतील तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करुन घ्यावं लागेल. शिवसेनेकडून आम्ही नेत्रतपासणी शिबिर लावत आहोत. कालच्या सभेमुळं भाजपसारख्या लोकांना पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे. कालची सभा बघून भाजप आणि महाराष्ट्रातील गुप्त बैठका घेतली असेल आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका दहा वर्षे घेऊ नये असा एखादा ठराव मंजूर केला असेल एवढा कालचा प्रतिसाद होता. पण राज्यात आणि देशात सत्ताबदलाच्या दिशेनं पावलं पडत आहेत.शिवसेना आत्तापर्यंत जिथं लढत नव्हती तिथं शिवसेनेचे पॅनल मोठ्या ताकदीनं निवडून आले. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या आम्ही हारलो तर मिशा काढू, आता मिशा काढल्यात का बघा नाहीतर आम्ही इथून पाठवतो तुमची हजामत करायला.उद्धव ठाकरे ६ मे रोजी कोकणात जातील सुरुवातीला ते बारसूमध्ये पोहोचतील तिथल्या ग्रामस्थांना भेटुन ते त्यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर ते महाडमध्ये सभेसाठी जातील. काही लोक म्हणतात कोकणात येऊ देणार नाही. पण कोकणातील जनता उद्धव ठाकरेंचं स्वागत करेल. असे देखील संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

अधिक वाचा  एक महिला दिन स्वयंपुर्णतेचा! खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते आरी वर्क किट प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा