शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवृत्त होणार, असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आज बोलताना शरद पवार आपल्या राजकीय आठवणींमध्ये रमले. ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांनी वाचायला शिकलं पाहिजे, व्यक्ती वाचन हे तुमच्या सर्वांच्या ज्ञानात भर टाकणार असेल. माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार नगरच्या प्रवरा साखर कारखाण्यात कृषी अधिकारी होते. त्यांनी मला नगरला बोलावून रयत शिक्षण संस्थेसोबत काम करण्यास सांगितलं. १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहेत.

अधिक वाचा  शिवडी विभागाच्या वतीने भीममहोत्सव-२०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न