मुंबई : शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. या आवृत्तीमध्ये त्यांनी राज्यातील सत्तांतराच्या सगळ्या प्रवासाबद्दल लिहिलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड करून पहाटेचा शपथविधी केल्याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकाशन सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अजित पवार यांनी केलेल्या बंडाला राष्ट्रवादीचा कसलाही पाठिंबा नव्हता, त्यांनी त्यांच्यासोबत काही आमदार घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. कारण त्याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नव्हता. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि नवं सरकार स्थापन झालं असा उल्लेख या आत्मचरित्रामध्ये केला आहे.

अधिक वाचा  जिवंत शिवसैनिकाला अखेर स्मशानात जाऊन तिरडीवर झोपावं लागलं, कारण….

बंड अयशस्वी झाल्यानंतर अजित पवार जास्त बोलत नव्हते. पण या नाराजीवर पडदा पडणे आवश्यक होता. विषय कौटुंबिक असल्यामुळे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याजवळ अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली. “जे घडलं ते चुकीचं झालं, असं घडायला नको होतं.” अशा शब्दांत अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या वादावर पडदा पडल्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. त्यामुळे या पुस्तकावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची चाहूल शरद पवार यांना त्या दिवशी पहाटे ६.३० वाजतात कळाली होती. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता पण ही गोष्ट समजताच त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल केला आणि या बंडाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचं सांगितलं. पण या शपथविधीमुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासही मदत झाल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.

अधिक वाचा  मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सरकारला 7 दिवस वेळ तोपर्यंत नव्या कायद्याला स्थगिती

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना या पुस्तकाच्या प्रकाशनामागे काही कारणे आहेत का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या पुस्तकातील अलीकडच्या तीन चार वर्षातील उल्लेखाकडे सर्वांचे लक्ष असेल