जळगाव, 29 एप्रिल : जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकांमध्ये शिंदे गट शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर पारोळा बाजार समितीमध्ये सत्तापरिवर्तन झालं आहे.पारोळा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे रावेर बाजार समितीमध्ये देखील शिवेसेना शिंदे गट आणि भाजपचा धुव्वा उडाला आहे. रावेरमध्ये महाविकास आघाडीने 18 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. पारोळ्यात युतीला धक्का पारोळा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली आहे.

18 जागांपैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर अवघ्या तीन जागांवर शिवसेनेला समाधान मानावं लागलं आहे. शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाल आहे.

अधिक वाचा  मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सरकारला 7 दिवस वेळ तोपर्यंत नव्या कायद्याला स्थगिती

विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.
धनुभाऊ जोमात, पंकजाताईंना मोठा धक्का; परळीत राष्ट्रवादी पुन्हा!रावेमध्ये मविआची मुसंडी तर दुसरीकडे रावेरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. रावेरमध्ये महाविकास आघाडीने 18 पैकी तेरा जागांवर विजय मिळवला आहे. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्हा हा गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. आता या बालेकिल्ल्यालाच मविआनं सुरूंग लावला आहे.