‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवू शकलेला नाही. सध्या सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपेशल फेल गेलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही एकप्रकारे ही एक मोठी निराशा आहे. ट्रेड विश्लेषकांनुसार, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं आठव्या दिवशीही फारशी चांगली कमाई केलेली नाही. या चित्रपटानं पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी बॉक्स ऑफिसवर फारच कमी कमाई केली. विकेंडला हा चित्रपट 68.17 कोटी रूपयांनी ओपन झालेला होता.
त्यामुळे या चित्रपटाची सुरूवातीची कमाई ही फारच छोटी होती. त्यानंतर सोमवारी या चित्रपटानं 10.17 कोटी रूपये कमावले आहेत. मंगळवारी या चित्रपटानं 6.12 कोटी तर बुधवारी 4.25 कोटी रूपये कमावले असून गुरूवारी 3.50 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. सलमानच्या करिअरमधला हा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला आहे.
तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे समजते आहे. हा चित्रपटही सध्या बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. त्यामुळे एकीकडे ऐश्वर्याचा चित्रपट हा प्रचंड हीट ठरला असून आता तो चांगलाच लोकप्रिय ठरला आहे.
आठवड्याभरानंतर 150 कोटी
Sacnilk या संकेतस्थळानुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानं भारतात 106.50 कोटी रूपये कमावले आहेत. तर भारताबाहेर 41.50 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. त्यामुळे एकूण या चित्रपटानं 148 कोटी रूपये तरी कमावले आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानं जगभरात आठवड्याभरानंतर इतकी कमाई करण्याचे यश मिळवले आहे. या चित्रपटांची ओपनिंग जरी चांगली असली तरी या चित्रपटाची कमाई नंतर फारच घटली आहे.
ऐश्वर्याचा पोन्नियिन सेल्वन: 2 सलमानच्या पुढे
समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, आठभरानंतर सलमानच्या चित्रपटानं 150 कोटी रूपये कमवले आहेत तेच 32 कोटी रूपयांच्याही पुढे ऐश्वर्याचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा दाक्षिणात्त्य चित्रपट पोहोचला आहे. पहिल्या दिवशी सलमानच्या ‘किसी का भाई आणि किसी की जान’ या चित्रपटानं 13 कोटींची कमाई केली होती तर पोन्नियिन सेल्वन: 2 नं 32 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या ऐश्वर्याच्या या आगळ्यावेगळ्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वेगळीच जादू दाखवली आहे.