बीड – जिल्ह्यातील वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी चुरस पाहायला मिळाली. येथील निकाल जाहीर झाला असून धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा पराभवाचे तोंड दाखवले आहे.सर्वच्या सर्व १८ जागा गमावल्याने पंकजा मुंडे यांचे खांदे समर्थक असलेल्या राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास महाआघाडीच्या १८ पैकी १८ सदस्यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.बीड जिल्ह्यातील ८ बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. आज परळीची देखील मतदान प्रक्रिया पार पडली असून निकाल हाती येणार आहे.यापूर्वी नगरपंचायत निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  अजून Action झालीच नाही, त्याआधी पाकिस्तानने काल रात्री काय-काय केलं जाणून घ्या