पुणे महानगरपालिकेकडे वारंवार आंदोलन आणि मागणी करून शिवप्रेमी मावळे म्हणून आम्ही आता थकलो आहोत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा… छत्रपती संभाजी उद्यान, जंगली महाराज रोड, पुणे या ठिकाणी बसवण्यात यावा यासाठी शिवप्रेमी म्हणून आपण पंधरा वर्षे पासून प्रचंड संघर्ष करत आहोत. बरीच आंदोलनात सुद्धा करण्यात आली आहेत. मात्र पुणे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असून महापालिकेत निवडून येणारे सत्ताधारी कारभारी सुद्धा सोयीने भूमिका घेतात सध्या तर शिवद्रोही वातावरण असल्यामुळे जाणीवपूर्वक छत्रपतींच्या पुतळ्यास विरोध केला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा उद्यानात बसवण्यासाठीचा पुतळा तयार असताना धुळीत पडून आहे. हा अवमान तुम्ही आम्ही कधीही सहन करणार नाही. जाणीवपूर्वक पुतळा बसवला जात नाही. म्हणून सर्व जाती-धर्माच्या व पक्ष, संघटनांच्या शिवप्रेमींच्या वतीने आपण सर्वजण पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊ आणि पुतळा बसवण्यासाठी आग्रह केला. म्हणून यापुढे आम्ही सर्व शिवप्रेमी आर या पारची लढाई लढणार आहोत… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?

पुणे महानगरपालिकेने एक तर आम्हाला छत्रपती संभाजी महाराज पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी किंवा मनपा ने स्वतः 14 मे पर्यंत पुतळा बसवावा अन्यथा आम्ही उद्यानात घुसून पुतळा बसवणार आहोत. अजिबात शांत बसणार नाहीत. अशा मागणीचे निवेदन पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त मा. दीपक ढाकणे यांच्याकडे देण्यात आले आहे.

यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, महादेव मातेरे, परेश मालपुरे, रोहन पायगुडे, मंदार बहिरट, प्रसन्न मोरे आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.