मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च स्वत:चे 19 बंगले गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे. नेमकं काय म्हणाले सोमय्या? कथित 19 बंगले प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च स्वत:चे 19 बंगले गायब केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून स्वत:च 15 जानेवारी 2021 ला चौकशीचे आदेश दिले. चौकशी कुणी करायची, कशी करायची, कुठे करायची, काय करायची, हे उध्दव ठाकरे यांनीच ठरवले. त्यानंतर चौकशीच्या नावाने बंगले गायब झालेल्या जागेचे फोटोसेशन करायचे आणि त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर युतीबाबत बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले आम्ही..
मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी दरम्यान या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि 19 बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणीही यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.