मुंबई – महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज मॉरेशियसमध्ये अनावरण होणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस मॉरेशियसला रवाना झाले आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून माहिती दिली.

आपल्या पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार. समुद्रापार घुमणार शिवगर्जना! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मॉरिशसमध्ये उभारला जातोय. त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

अधिक वाचा  पुणे तिथे काय उणे! प्लास्टिकची बंदूक दाखवून २५- ३० तोळे लुटून आरोपी फरार; मालकही बघत राहिला

फडणवीस यांनी काही तासांपूर्वीच मॉरेशियसकडे प्रस्थान केलं आहे. याबाबतचे फोटेही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज सायंकाळी साडेसात वाजता पुतळ्याचे अनावरण होणार आहे.