मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यावेळी राज ठाकरे यांना अनेक सवाल उपस्थित केले. त्यावेळी त्यांने दिलखुलास उत्तर दिली. दरम्यान, मुलाखतीमधील एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. तो म्हणजे अमृता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली बाजू.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतली. यावेळी, अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना राजकारणात नेमकं ते कुणाच्या बाजूने आहेत? असा सवाल उपस्थित केला. त्यावर राज ठाकरेंनी उलट सवाल केला. मात्र, त्यांचा हा सवाल अमृता फडणवीसांनी वैयक्तिक घेतला.
नेमकं काय घडलं?
अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना राज ठाकरे कधी राष्ट्रवादीसोबत दिसतात कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेजवळ दिसतात, कधी भाजपला टाळी देता.. कभी हाँ कभी ना खूप पाहिलं आता पुढे हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा…
फडणवीसांच्या या उत्तराला राज ठाकरेंनी उलट सवाल केला. मिश्किलपणे हसत म्हणाले, तुम्ही देवेंद्र याच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहात….काय आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणासोबत आहेत तेच कळत नाही….
असं राज ठाकरेंनी बोलताच अमृता फडणवीसांनी सवाल वैयक्तिक घेत नाही नाही ते लॉयल आहेत.
त्यावर राज ठाकरेंनी न थांबता ते पहाटे गाडी घेऊन कुठे तरी जातात. त्याचा तुम्हाला पत्ता नसतो, कधी कधी ते शिंदेंबरोबर असतात. तर कधी अजित पवार नाराज असतात..अशी उदाहरणं देऊन राज ठाकरेंनी अमृता फडणवीसांना टोमणे मारले.