मुंबईः विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबद्दल इच्छा व्यक्त केली अन् राज्याच्या राजकारणात घमासान निर्माण झालं. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अमोल कोल्हे बुधवारी सांगली दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी एक विधान केलं. कोल्हेंनी जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही. असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीत दोन गट आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिक वाचा  सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, ते उगाच वाद घालत बसतात; शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून धारशिव, नागपूर आणि आता उल्हासनगर येथे बॅनर झळकले आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील हेच भावी मुख्यमंत्री असतील, असं स्पष्ट केलं आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दुसरं विधान केलं आहे. अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच.. राज्याचं राजकारण सांभाळेल असा दुसरा नेता नाही, असं अमित शाह म्हणाल्याचा दाखला अमोल मिटकरी यांनी दिला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं मिटकरी म्हणाले.

अधिक वाचा  बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर! खेळाडू मालामाल! ही नावं वगळली या नव्या चेहऱ्यांचा समावेश संपूर्ण यादी