अमित शाह यांनी कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसविरोधात केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसने कर्नाटकात तक्रार दाखल केली आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली आहे. अमित शाह यांनी कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी ‘काँग्रेसचे सरकार आल्यावर राज्यात दंगली होतील.’, असे वक्तव्य केले होते. अमित शाह यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसने अमित शाह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यासोबतच काँग्रेसने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

अधिक वाचा  कॅशलेस उपचार आणि बरंच काही; राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय 5 मुद्द्यांमध्ये

कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या रॅलीच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रक्षोभक विधाने आणि प्रचार केल्याप्रकरणी बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलिस ठाण्यात काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर भडकाऊ वक्तव्य करणे, शत्रुत्व आणि द्वेष वाढवणे आणि विरोधकांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी सांगितले की, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात की, काँग्रेस सत्तेवर आली तर जातीय दंगली होतील. ते असे कसे बोलू शकतात? याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर, काँग्रेस नेता रणदीप सिंह सुरजेवाल यांनी सांगितले की, जर भारताच्या गृहमंत्र्यांनी चुकीची विधाने दिली ज्यामुळे धर्म आणि समुदायांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण कोण करणार. आम्ही गृहमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा  माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मुलींना योग्य घर मिळेना; म्हणाले…. ‘सवलत नव्हे, तर हक्क म्हणून सुविधा द्या!’