पुणे : सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न असते. त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी जमा करतो आणि आपले एक छोटे घर बुक करतो. परंतु सध्या विविध कारणांनी अनेक बिल्डरांचे प्रकल्प दिवाळखोरीकडे जात आहेत. त्यातील काही प्रकल्प बंद झाले आहे तर काही सुरु आहेत. दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या प्रकल्पांची संख्या 308 आहे. महारेरा म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. पुणे शहरातील 63 प्रकल्पांनाही फटका बसला आहे. महारेराने सर्व प्रकल्पांबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

का झाली दिवाळखोरी
महाराष्ट्रातील 308 गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये दिवाळखोरी वाढली आहे, त्यापैकी 115 अद्याप सुरू आहेत आणि 193 आधीच बंद झाले आहेत. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. विविध बँका, वित्तीय संस्था आणि इतर पतपुरवठादारांनी या 308 प्रकल्पांविरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली आहे.

अधिक वाचा  नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडायला सुरुवात, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

कुठे किती प्रकल्प
मुंबई महानगरात 233, पुण्यात 63 आणि अहमदनगरमध्ये पाच, सोलापूरमध्ये चार आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगली येथे प्रत्येकी एक प्रकल्प दिवाळखोरीत आले आहे. बंद पडलेल्या 193 प्रकल्पांपैकी 150 प्रकल्पांमध्ये 50% पेक्षा जास्त जणांनी फ्लॅटची बुकींग केली आहे. महारेराकडून सर्व प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी छाननी होते.

ठाण्यातील सर्वाधिक 100 प्रकल्प
दिवाळीखोरीला आलेल्या 308 प्रकल्पांपैकी 100 प्रकल्प ठाणे जिल्ह्यात, त्यानंतर 83 मुंबई उपनगरात आणि 63 पुणे जिल्ह्यात आहेत. पालघरमध्ये 19 प्रकल्प, रायगड 15, अहमदनगरमध्ये पाच, सोलापूर चार, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूर, आणि सांगली येथील एक एक प्रकल्पाचा समावेश आहे.

अधिक वाचा  मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय

सुरु असलेले प्रकल्प
सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये ठाणे परिसरातील 50, मुंबई उपनगरातील 31, मुंबई शहरात 10, पुणे आणि रायगडमधील प्रत्येकी आठ, अहमदनगरमधील पाच, पालघरमधील दोन आणि सोलापूरमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. रखडलेल्या प्रकल्पांची संख्या १९३ असून, पुण्यात ५५, मुंबई उपनगरात ५२, ठाण्यात ५०, पालघरमध्ये १७, रायगडमध्ये सात, मुंबईत पाच आणि सोलापूरमध्ये तीन प्रकल्प आहेत.

पुणे शहरात विक्रमी दर
पुणे शहरातील भूखंड विक्रीचा यंदा विक्रम झाला आहे. सण 2022 मध्ये अडीच हजाराहून जास्त जणांनी भूखंड खरेदी केली आहे. एकूण 2582 पुणेकरांकडून नवीन जमिनीची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. पुणे शहरात गेल्या दहा वर्षात यंदा सर्वात जास्त जमिनीची खरेदी झाली आहे. खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यामुळे जमिनीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

अधिक वाचा  ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? ट्रेलर पाहून म्हणाले..