पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने स्थायी समितीच्या बैठकीत सभा क्रमांक ६ विषय क्रमांक २८ दिनांक १७/४/२३ ठराव क्रमांक ५२ नुसार केलेली महात्मा फुले मंडईतील गाळे भाडेवाढ बेकायदेशीर असून या स्थायीच्या निर्णयाविरोधात पुणे मविआच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून पुणे महापालिका आयुक्तांनी ही बेकायदेशीर भाडेवाढ रद्द न केल्यास या बेकायदेशीर निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने मंडईच्या गाळ्यांची भाडेवाढ 26% केली आहे ती कायद्याच्या कसोटीवर अमान्य आहे. महात्मा फुले मंडईची रचना आठ पाकळ्यांच्या मध्ये करून प्रत्येक पाकळी विशिष्ट भाजीपाला भाज्या मिरच्या कोथिंबीर आलं लसूण भिजवलेली कडधान्य केळीं कांदे बटाटे फळे नारळ लोणी चक्का पत्रावळी केळीची पाने खुंट तसेच आतील गोलात मसाले उपहारगृह त्याच्या अनुषंगाने गोष्टी विक्रीसाठी ठेवलेले आहेत. जेणेकरून एकदा गिन्हाईक आत आले की तरकारी विषयातल्या सगळ्या गोष्टी खरेदी करूनच तो बाहेर पडेल. अशी रचना केलेली असताना दुर्दैवाने प्रशासकीय दुर्लक्षामुळे आणि राजकिय हस्तक्षेपामुळे मंडईच्या बाहेर मंडई एक नवीन संकल्पना उदयास आली आणि यामुळे आत मध्ये पिढ्यान पिढ्या व्यवसाय करणाऱ्या गाळा धारकांना आतमध्ये व्यवसाय करणे अडचणीचा होऊ लागलं.
मंडईतील गाळे हे तेथील व्यापाऱ्यांकडे गेल्या तीन-चार पिढ्यापासून आहेत त्यातच कुठल्यातरी अधिकान्याच्या मनामध्ये आलं की गाळ्यावर जो माणूस बसतो तो परवानाधारक आहे का नाही याची तपासणी करा. मंडई विभागात साधारण सकाळी ४ च्या सुमारास काम सुरू होतं आणि महापालिकेच्या मंडई विभागात ८ वाजता काम सुरू होतं. ३ वाजता आलेली घरातली व्यक्ती सहा साडेसहाला जाते मग दुसरी येते हा एकत्र कुटुंबाचा व्यवसाय असतो कुठल्या विशिष्ट व्यक्तीचा नसतो ही संकल्पनाच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळाली नाही. त्यामुळे ज्याचा नावावर गाळा त्यानीच बसावं ही सक्ती एकत्र कुटुंब पद्धत आणि कौटुंबिक कलहाला निमंत्रण देणारी असेल.
मंडईतील गाळे सध्या त्याचे भाडे 32 रुपये आहे. शासन निर्णयानुसार दर तीन वर्षांनी १२% भाडेवाढ झाली पाहिजे. एका ६४५ च्या गाळ्याला ३२ रूपये भाडे होते तेव्हा प्रति चौरस फूटाला १.०४ रूपये दर होता आज अचानक त्याच ३० चौरस फूटाला २८ रूपये भाडे करताना कशाच्या आधारावर मूल्यांकन केलय. या मंडईच्या विभागामध्ये असणाऱ्या भांड्यांचे दुकान 180 फुटाचे आहे त्यांचे भाडे चारशे पन्नास रुपये होते भाव वाढ सूत्रानुसार त्यांचे भाडे दहा टक्के वाढवले आणि आज ते पाचशे रुपये झाले. महाराष्ट्र शासनाने २१ फेब्रुवारी २००८ रोजी काढलेल्या राजपत्रात नमूद केलेल्या भाग ७ कलम ८ (१) मध्ये वर्णन केलेल्या क्षेत्रफळामध्ये गाळेधारक बसतात. गाळ्याचे क्षेत्रफळ ६ x ५-३० चौरस फूट आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता स्थायी समितीने मंजूर केलेली भाडेवाढ ही बेकायदेशीर आहे.
दरवर्षी 12 टक्के दरवाढ आणि 2025 साली पुन्हा फेरमूल्यांकन या दोन्ही बाबी बेकायदेशीर आहेत. या गाळ्यांचे केलेले मूल्यांकन कायद्याला धरून केलेले नाही त्यामुळे रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्य सभेत हा विषय मंजूर करण्यापूर्वी चर्चेसाठी ‘वेळ द्यावा.’ अन्यथा न्याय मागण्यासाठी मेहरबान महाराष्ट्र सरकारकडे जावे लागेल.