कोची – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या कोची दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. या कारवाईत किमान सात कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दक्षतेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले आहे.

आज पहाटे पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर ही कारवाई केल्याचे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महंमद शियास यांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये केरळ प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस थम्पी सुब्रमण्यम आणि जिल्हा पदाधिकारी श्रीकुमार यांचा समावेश आहे.

पंतप्रधान सोमवारी केरळच्या दौन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यात त्यांचा आयएनएस गरुडा आणि अन्य ठिकाणी कार्यक्रम आहे. त्यामुळे शहरात मोठाच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 2060 पोलीस कर्मचारी त्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक वाचा  फडणवीस सरकारचा बाजार समित्यांबाबत एकच मोठा निर्णय; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही झोपच उडाली