हडपसर गाव ते ससाणे नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालय,पांढरे मळा तसेच ससाणे नगर पुल येथील रस्त्यावर प्रंचड खड्डे पडलेले असून यामुळे तिन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहतूकीला सतत कोंडी ला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्याला गेली अनेक वर्ष डांबरीकरण झालेले नसून प्रत्येक वेळी पॅचेस मारून मारून रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून हांडेवाडी, महंमद वाडी,काळे-बोराटेनगर,उंडरी,वडाचीवाडी,औताडवाडी,ससाणेनगर कडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे, त्यामुळे दिवसभरात पांढरे मळा येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते.यामदये शाळेच्या स्कूल बस वाहतूक कोंडीत अडकून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
उद्धव बा.ठाकरे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर म्हणाले कि गेली तीन वर्षं या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करावे म्हणून सतत पाठपुरावा महापालिकेला पत्रे दिली आहेत, परंतु प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे.
या संदर्भात उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर यांनी आज पुन्हा हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त काटकर यांना या रस्त्याचे संपुर्ण डांबरीकरण करण्याची मागणी चे पत्र देण्यात आले. येत्या दहा दिवसांत डांबरीकरण न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कायदेशीर मार्गाने क्षेत्रीय कार्यालय येथे मोर्चा ने आंदोलन केले जाईल असे महेंद्र बनकर यांनी इशारा दिला.यावेळी विभागप्रमुख दत्ता खवळे,अनिल धायगुडे, अनिकेत सपकाळ मयुर फडतरे उपस्थित होते.