मांजरी येथे ‘संस्कार व परंपरा’ जोपासणारी शाळा म्हणून नावाजलेल्या “व्हिनस वर्ल्ड स्कूल” मध्ये दिनांक 21एप्रिल 2023 रोजी ‘मातृदिन सोहळा’ उत्साहात पार पडला. सुट्ट्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आधीच साजरा करण्यात आला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृण्मयी वैद्य मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नीलिमा वाघुळदे मॅडम, सौ. कल्पना क्षीरसागर मॅडम, श्री. देशपांडे सर, श्री. धैर्यसिंह पाटील सर, श्री. प्रकाश क्षीरसागर सर आणि शाळेचे संस्थापक श्री. माधव राऊत सर यांची उपस्थिती लाभली.
आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगात पालक आणि पाल्यांचा संवाद कमी झाला आहे. मातृदिनाचे औचित्य साधून आई आणि पाल्याचा संवाद होणे किती गरजेचे आहे याविषयी सौ. नीलिमा वाघुळदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच शारीरिक मानसिक

अधिक वाचा  महाराष्ट्रात शहांच्या प्लानवर काम सुरु भाजपनं गियर बदलला; दोन्ही DCMचे होमग्राऊंड ताब्यात घेण्यासाठी टीम देवेंद्रचे शिलेदार सक्रिय

आरोग्यासाठी सात्विक व योग्य आहाराची गरज या विषयावर सौ. कल्पना क्षीरसागर मॅडम यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास होणे आवश्यक आहे त्यासाठी मुलांनी खेळणे गरजेचे आहे याविषयी श्री. देशपांडे सर यांनी आपले विचार व्यक्त केले.
अशा या सोहळ्याला विद्यार्थी आणि माता पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली त्यामुळेच हा सोहळा अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला.