कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. येथे १० मे रोजी मतदान होत आहे. दरम्यान, जनता दल सेक्युलर (जेडीएस)चे नेता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एचडी कुमारस्वामी यांच्यावर बैंगलुरु येथील मणिपाल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉ.सत्यनारायण मैसूर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.

जेडीएसच्या प्रचाराची धुरा एचडी कुमारस्वामी यांच्या खांद्यावर आहे. निवडणुक जाहीर होण्यापूर्वीपासून ते प्रचारात व्यग्र होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसनंतर तिसऱ्या क्रमांकावर जेडीएस पार्टी होती. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी जेडीएसने काँग्रेसला कमी जागा मिळाल्यानंतरही पाठिंबा दिला होता. एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले होते.पण काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हे सरकार कोसळले. एचडी कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले.

अधिक वाचा  नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडायला सुरुवात, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत भाजपने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे पुन्हा सत्तेत येण्यासाठी जेडीएस प्रयत्नशील आहे. पण कुमारस्वामी यांची तब्येत बिघडल्याने ते प्रचारापासून सध्या अप्लित आहे. त्यामुळे जेडीएसचे कार्यक्रते, पदाधिकारी चिंतेत आहेत. कर्नाटकचे प्रसिद्ध आदिचुंचनगिरी मठचे मुख्य पुजारी निर्मलानंदस्वामीजी यांनी एचडी कुमारस्वामी यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. तब्येत बरी झाल्यावर लवकरच प्रचारात सक्रिय होणार असल्याचे एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले.