जळगाव : आज (२३ एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.यासाठी दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत पाचोऱ्यात आहेत. अशातच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी संजय राऊतांसह आयोजक आणि चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे आर ओ पाटील यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. त्यानिमित्त हि सभा आयोजित करण्यात आली आहे.

काय म्हणाले किशोर पाटील माध्यमांशी बोलताना किशोर पाटील म्हणाले की, माझे काका दिवंगत नेते आर ओ पाटील यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे आले देखील नाहीत. संजय राऊतांमुळे खर उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. ही माझ्या दिवंगत काकांसाठी सभा आहे. त्यामुळे कुठलंही गालबोट लागणार नाही. तसेच ही सभा शांततेत पार पाडावी, याची जबाबदारी मी घेत असून आमचे नेते गुलाबराव पाटील यांनाही विनंती करणार असल्याचे पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटले आहे. तसचं राऊत यांना सल्ला आहे की तुमच्या बेताल वक्तव्यांमुळे महाराष्ट्र आज अस्वस्थ झाला आहे. कधी कधी शंका येते की “राऊत यांनीच तर उद्धव ठाकरे यांना संपवायची सुपारी घेतली तर नसेल ना?” असा खळबळजनक सवाल देखील किशोर पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा  वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सुनावणीवेळी काय काय घडलं?

दरम्यान, या सभेकडे राजकीय हेतूने पाहत नाही. मी त्या सभेसाठी येणाऱ्या सगळ्या लोकांचे स्वागत करतो. मात्र सभेला जाणार नाही, आता पुतळ्याच्या लोकार्पणाची सभा आहे. अशा गोड कार्यक्रमात जर कुठे गालबोट लागलं तर? कारण शेवटी मी एकटा जाणार नाही. माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते असणार आणि शेवटी कार्यकर्ता असतो. सध्या संजय राऊत यांच्याकडून एखादं बेताल वक्तव्य झालं आणि तिथे एखादा कार्यकर्ता असला तर सभेची वाट लागणार. तसचं गुलाबराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी देखील सभा उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे आजची सभा नीट पार पडावी यासाठो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे

अधिक वाचा  ‘ब्राह्मणांनो महिलांना सोडा, इतकी सभ्यता…,’ अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट, म्हणाला ‘तुमचे संस्कार…’