राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं तर डोईजड होतील अशी शंका पक्षातील नेत्यामध्ये असावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते म्हणाले की,अजित पवारांची अनेक दिवसांपासून राज्याचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे. बहुमत असताना देखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद घेतलं नाही कारण, ते पद घेतलं असत तर, ते अजित पवारांना द्यावं लागेल, आणि अजितदादांना मुख्यमंत्री पद दिलं तर ते डोईजड होतील.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांकडून मंत्री अतुल सावे यांना झटका, आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मंजूर कामांना स्थगिती

अशी शंका पक्षात कोणाला तरी आली असेल त्यामुळे नेमानं मिळणारं मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी पक्षानं नाकारलं अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांची मुलाखत मी पाहिली नाही. कोणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल तर यात काही गैर नाही, अनेकांना ते आवडते. पण प्रत्येकजण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आम्ही त्यांना (राष्ट्रवादीचे अजित पवार) शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तसेच राज्यातील राजकारणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीत काय चालले आहे हे मला माहीत नाही, मी वारंवार सांगितले आहे की ते स्वतःला ‘वज्रमुठ’ म्हणवून घेतात पण त्यात अनेक तडे आहेत, ते ‘वज्रमुठ’ कधीच असू शकत नाहीत.

अधिक वाचा  ‘फुले’ हिंदी चित्रपट ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया