मध्य प्रदेशमधील दिंडोरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नाव नोंदवणाऱ्या तरुणींची कौमार्य आणि गर्भधारणा चाचणी करण्यात आली आहे.यामुळे विरोधकांना भाजप सरकारच्या या अजब कारभारावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री ओंकार मरकाम यांनी शिवराज सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारने वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली तरुणींची कौमार्य आणि गर्भधारणा याचणी केली, असा आरोप काँग्रेस आणदार ओंकार मरकाम यांनी केला. मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत अशा चाचण्या घेण्यासाठी सरकारने काही नियम बनवले असतील तर ते सार्वजनिक करावे. अशा चाचण्या घेणे महिलांचा अपमान असल्याचे ते म्हणाले.भाजप नेते म्हणतात, हे योग्यच दरम्यान, भाजप जिल्हाधाक्ष अवधराज बिलैया यांनी या चाचण्यांचे समर्थन केले आहे. याआधी अनेकदा लग्नावेळी तरुणी गर्भवती आढळून आल्याने ही खबरदारी बाळगल्याचे त्यांनी सांगितले. तर सीएमएचओ दिंडोरी, डॉ. रमेश मरावी यांनी आम्हाला वरतून जे आदेश आले त्याचे आम्ही पालन केल्याचे म्हटले.

अधिक वाचा  नितीन गडकरींचा गडचिरोली नक्षलविरोधी ‘मेगा प्लॅन’! परिस्थिती अत्यंत बिकट होती ‘ही’ संख्या 1 लाख करायचीय

नक्की प्रकरण काय?

दिंडोरी जिल्ह्यातील गडसराय शहरामध्ये शनिवारी जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री कल्यादान योजनेंतर्गत 219 जोडप्यांची लग्नं लावून दिली. परंतु या सामूहिक विवाहसोहळ्यासाठी आलेल्या अनेक तरुणींची नावे यादीत आढळून आली नाहीत. कौमार्य आणि गर्भधारणा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा यादीत समावेश केला नसल्याचे समोर आले.नाव नोंदणी केली, पण…बाचरगाव येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीने मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत लग्न करण्यासाठी अर्ज भरला होता. आरोग्य केंद्रामध्ये तिने वैद्यकीय चाचणीही केली. परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपले नाव यादीतून वगळल्याचे तरुणीने सांगितले. तसेच बच्छरगाव येथील एका तरुणीनेही आपल्याला वैद्यकीय चाचणीबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते असे म्हटले. आम्ही तयारीनीशी लग्नस्थळी पोहोचलो, परंतु लग्न होऊ शकले नाही, अशी खंत तरुणीने बोलून दाखवली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत लग्नासाठी तरुणींची कौमार्य आणि गर्भधारणा चाचणी करणे योग्य नसल्याचे सरपंच मेदनी मरावी यांनी म्हटले.

अधिक वाचा  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?