जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पाचोऱ्यात सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक युद्ध रंगले असताना दुसरीकडे मनसे रस्त्यावर उतरली आहे. संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे Raj यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध मनसेकडून करण्यात आला. पाचोऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात जळगावमध्ये संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावरुन मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत पाचोऱ्यामध्ये मनसेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी राऊतांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला. आज पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होत असून त्यापार्श्वभूमीवर पाचोऱ्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
संजय राऊतांना गुलाबराव पाटलांवर निशाणा संजय राऊत यांनी मनसेसोबतच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा, कारण ते शिवसेनेच्या नावावर निवडून आले आहेत. आपण आज सुवर्णनगरीत आहोत, ते आमच्यासोबत सोनं म्हणून राहिले मात्र आता कोळसा झाल्याचा टोला राऊतांनी गुलाबराव पाटील यांना लगावला होता.