काही लोक देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिरस्काराचं राजकारण करत आहेत. पण मी आर्थिक शक्ती आणि पेंद्रीय एजन्सींसोबत लढायला तयार आहे. झुकणार नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला ठणकावले.देशात कुणाची सत्ता येणार हे ठरवण्यासाठी वर्षभरात निवडणुका होणार आहेत. आपण सगळे एकजूट करून देशाचं विभाजन करू पाहणाऱ्या या शक्तींच्या विरोधात उभं राहण्यासाठी वचनबद्ध होऊयात. लोकसभा निवडणुकीत आपण अशा शक्तींना देशाच्या सत्तेवरून खाली खेचणं हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे. जर आपण लोकशाही वाचवण्यात अपयशी ठरलो तर सगळंच नष्ट होईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ते म्हणतात ठोक दो, ठोक दो…, अरे ठोक दो काय? जर आम्ही एकत्र आलो तर तुमची खुर्ची कोसळेल.बिल्किस बानो प्रकरणात सर्वांची सुटका झाली आहे, पण आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार.
आम्हाला शांतता हवी आम्हाला दंगली, संघर्ष नको आहे. शांतता हवी आहे. आम्हाला देशाचे विभाजन करायचे नाही. मी मरेन, पण देशाचे विभाजन होऊ देणार नाही. मात्र काही लोक भाजपकडून पैसे घेतात आणि आम्ही मुस्लिम मते फोडू असे म्हणतात, पण असे होऊ शकत नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. भाजप देशाचं संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे असाही आरोपही त्यांनी केला.