मुंबई- बदनाम करुन अजित पवारांना त्यांच्याच पक्षातून बाहेर ढकलण्यात येत आहे. ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होईल.त्यांचाही राज ठाकरेच होईल ,मुलीच्या हातात पक्ष द्यायचाय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये अशी टिप्पणी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.अजित पवार यांनी कोणी आमच्या वाट्याला आले तर त्यांची मस्ती उतरवण्याची धमक आमच्यात आहे, असे म्हणत शिवसेनेच्या विजय शिवतारेंवर टीका केली होती. आता विजय शिवतारेंनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ना घर का ना घाट का असे म्हणत अजित पवारांचा पुढचा राज ठाकरे होणार, अशी टिप्पणीही शिवतारेंनी केली आहे.

अधिक वाचा  कॅशलेस उपचार आणि बरंच काही; राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय 5 मुद्द्यांमध्ये

विजय शिवतारे म्हणाले, अजित पवार यांचे रोखठोक, परखड बोलणे असले तरी त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला जात आहे. स्वतः त्यांच्या घरातून त्यांना विरोध आहे. जे शिवसेनेत घडले होते तेच अजित पवार यांच्या बाबतीत होत आहे. ताकद चांगली असतानाही राज ठाकरेंना डावलून महाबळेश्वरच्या सभेत उद्धव ठाकरे यांना वारस करण्यात आले होते.

विजय शिवतारे म्हणाले, अजित पवारांना पक्षाबाहेर ढकलण्याचे काम सुरु आहे. शरद पवार म्हणाले होते, माझ्या पक्षातून कोणी जात असेल तर जाऊ दे. दुसऱ्या दिवशी सामनात रोखठोक सदरात याबाबत छापून आले. बदनाम करुन अजित पवारांना पक्षातून ढकलण्यात येत आहे. ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होईल.विजय शिवतारे म्हणाले, अजित पवारांची पक्षात अडचण होत आहे. शरद पवारांना मुलीच्या हातात पक्ष द्यायचा आहे, त्यासाठी ही डिप्लोमसी सुरु आहे. तसेच अजित पवार यांनी माज उतरवण्याची भाषा करू नये. स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल विजय शिवतारे यांनी यावेळी केला.

अधिक वाचा  पंजाबसाठी विजयानंतर गूड न्यूज, आरसीबीला तिसऱ्या पराभवानंतर मोठा झटका

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार आपल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, विजय शिवतारे हे माझी बहीण सुप्रिया सुळे आणि आमचे दैवत शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत होते. पवारसाहेबांची उंची आणि सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील काम पाहून त्यांच्यावर टीका होणे, मला योग्य वाटत नाही. त्यामुळे कुणाला मस्ती आली तर ती जिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, असा इशारा अजित पवार यांनी पुन्हा दिला.