मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे अतिशय आक्षेपार्ह आहे. यामुळे प्रभू श्री राम भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.आव्हाडांनी राज्यात जातीय दंगली होतील, असे वक्तव्य केले.त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आगामी काळात तुम्ही राज्यात दंगली करणार आहात असा तुमच्या वक्तव्याचा अर्थ घ्यावा का, असा सवालही केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे जे विधान हे आक्षेपार्ह आहे. राम नवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल ती अत्यंत शांतपणे साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीराम आणि आणि हनुमानाच्याबाबतील प्रचंड श्रद्धा आहे. हा समस्त समाजाचा आणि राम भक्ताचा अपमान आहे. मला असे वाटते की त्यांनी संवेदनशीलपणे बोलावे.महाराष्ट्रात आगामी काळात काही दंगली होतील म्हणजे तुम्ही काही ठरवले आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे. मला असे वाटते की किमान नेत्यांनी तरी सनसनाटी तयार करु नये, शांतपणे बोलावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अधिक वाचा  माफी मागा ते 36 हजार कोटी आम्हाला द्या; बांगलादेशने आता पाकिस्तानकडे मोर्चा वळवला! नेमकं प्रकरण आहे तरी काय?

भाजप नेते आमदार राम सातपुते यांनीही ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राम सातपुते ट्विटमध्ये म्हणाले की, या अफजलखानाच्या औलादींचा माज दिवसागणिक वाढतच चालला आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान करणारा जीतूद्दीन हिंदू धर्माला समजतो तरी काय? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पवित्र हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या या चिंपाट वर कारवाई झालीच पाहिजे! अशी मागणी त्यांनी केली आहे.