पुणे – मागील काही दिवसांपासून राजकारणाऱ्या केंद्रबिंदू असलेले अजित पवार यांच्याविषयी सातत्याने विविध चर्चा होत असतात.अजित पवार भाजपात जाणार अशा बातम्याही झळकल्या. परंतु स्वत: अजितदादांनी या चर्चेला स्पष्ट शब्दात नकार देत जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करणार असल्याचे म्हटलं. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. पण हेच अजितदादा घरीही तसेच असतात का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.

याचबाबत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त असतात. अत्यंत कमी वेळ ते घरात असतात. पण कधी आमच्यासाठी नॉट रिचेबल नसतात. अनेकदा ते घरी फोन करतात किंवा मला वाटले बोलावे तर त्यांच्याशी फोनवर बोलणे होते. मी माहेरी राजकारण पाहिले होते. पण सासरी जबाबदारी आणि अपेक्षा असतात. त्या आव्हानांना पेलत इथपर्यंत आलोय. घरात काही किरकोळ वाद झाले तरी त्यात अंतिम शब्द अजितदादांचाच असतो असं त्यांनी म्हटलं.

अधिक वाचा  महाराष्ट्रात पाणीसंकट गडद ३६ पैकी १७ जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू निम्म्या महाराष्ट्रात टंचाई!

अजितदादांची ‘ही’ सवय अजिबात आवडत नाही अजित पवार सातत्याने गर्दीच्या गराड्यात असतात. त्यात प्रत्येक माणसाच्या कामाचा निपटारा झाल्याशिवाय ते जेवत नाहीत. स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे हे कळत नाही. ५० लोकांना बोलावले तर ५०० लोक भेटायला येतात. लोकांना नाही म्हणणं हे अजितदादांना जमत नाही. त्यामुळे आपोआप उशीर होतो. वेळेवर न जेवणे हे मला आवडत नाही. वेळेवर सर्व गोष्टी केल्या पाहिजेत हा माझा हट्ट असतो. कधी कधी ऐकतात अशी प्रेमळ नाराजी पत्नी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

महिला सक्षमपणे बदल घडवू शकतात शरद पवारसाहेबांनीच महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. महिला अनेक पदावर काम करतायेत. सरपंचपदापासून अनेक मोठ्या पदावर महिला काम करतात. जर वातावरण चांगले असेल तर महिला सक्षमपणे काम करू शकतात. बदल घडवू शकतात असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अधिक वाचा  अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजित १३४ व्या भीमजयंती महोत्सवानिमित्त विनामूल्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

अजितदादांना आवडते जंगलसफारी जेव्हा वेळ देणे शक्य असते तेव्हा अजित पवार कुटुंबासोबत फिरायला जातात. अजितदादांना जंगलसफारी करायला आवडते. वेळ मिळतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना घेऊन ते नॅशनल पार्क किंवा परदेशात जायला आवडते. आता सध्या त्यांना वेळच मिळत नाही असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.