मुंबई, 22 एप्रिल: शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नेहमी चर्चेत असतात. अमोल कोल्हे सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात.आता त्यांनी आज ईदच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. नेटकऱ्यानी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी हटक्या शब्दात रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काय म्हणालेत ते नक्की जाणून घ्या.

रमजानचा पवित्र महिना आज संपला असून देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी होत आहे. मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळेजण मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. यात अनेक राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे.

अधिक वाचा  सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, ते उगाच वाद घालत बसतात; शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

अनेक राजकीय नेते देखील रमजान ईदच्या शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर सूचक पोस्ट केली आहे. अमोल केल्हे यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की, ‘ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak असं लिहिलं..

“I” लई Important… नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल! E”i”d Mubarak!” अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी केली आहे. त्यांच्या या मिश्किल पोस्टवर चाहत्यांनी देखील शुभेच्छा देत आपलं मत मांडलं आहे.

लग्नाची बेडी फेम संकेतची होणाऱ्या बायकोसोबत हळदी अन् संगीत कार्यक्रमात फुल्ल धम्माल; पाहा फोटो देशभरात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ईडीवरुन टीका केली जात आहे. विरोधकांना झुकवण्यासाठी सरकार ईडी या यंत्रणेचा गैरवापर करत आहे, असा आरोप सातत्याने विरोधक करत असतात. संजय राऊतांपासून ते राहुल गांधीपर्यंत अनेकांनी ईडीला सरकारच्या हातातील खेळणे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी उपरोधिकपणे ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्यामुळे सध्या अमोल कोल्हेंची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली दिसून येत आहे.

अधिक वाचा  ‘तू मला रोखू शकत नाहीस,’ धोनीचा उल्लेख करताच अश्विनने पॅनलिस्टला केलं गप्प; म्हणाला ‘CSK च्या…’

आज रमजान ईद सोबतच हिंदू बांधवांचा अक्षय्य तृतीया हा सणसुद्धा आहे. सध्या हे दोन्ही सण महाराष्ट्रात उत्साहात साजरे होत आहेत. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ते सध्या राजकारणासोबतच अभिनयात देखील सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तर त्यांच्या शिवपुत्र संभाजी’ या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सर्वत्र दमदार चालू आहेत. त्यांच्या या नाटकाला ठिकठिकाणच्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहेत.