ट्विटर हँडलवरील अकाऊंटची ‘ब्लू टीक’ वापसी केल्याबद्दल अभिनेते अमिताभ बच्चन खूश झाले आहेत. या आनंदाच्या भरात त्यांनी आपल्या हटके अंदाजात ट्विटर सीईओ एलन मस्क याचे आभार मानले आहेत.

तेसुद्धा खास गाण्यात. ‘तू चीझ बडीहै मस्क मस्क’, असे म्हणत बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्विटरने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून आगोदरच्या लेगसी अकाऊंटच्या ब्लू टीक हटवल्या होत्या. त्यामुळे देशभरातील राजकारणी, सेलिब्रेटी खेळाऊन आणि अनेकांच्या ब्लुटीक गायब झाल्या होत्या. ज्या आता परत आल्या आहेत. यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, तरी शिवद्रोही कोरटकरचा राजेशाही थाट? घरपोच पोलीस सुरक्षा

ट्विटरने यापूर्वी मायक्रोब्लॉगिंग साइटवर ब्लू टीक पडताळणी बॅजसाठी USD 8 शुल्क आकारणारी सशुल्क सदस्यता सेवा लागू करण्याची घोषणा केली होती. ज्यांनी वेळेत पैसे भरले नाहीत किंवा सेवा खरेदी केली नाही त्यांनी आपापल्या हँडलवरील अधिकृत दर्जा दाखवणारी ब्लू टीक गमावली. (हेही वाचा
,Elon Musk याचा नवा फंडा, ‘ब्लू टीक’ घ्या आणि टाईमलाईनवर जाहिरातींपासून 50% सुटका मिळवा, दृश्यमानताही वाढवा

बच्चन यांनी काय म्हटले ट्विटमध्ये?

T 4624 – ए Musk भैया ! बहुत बहुत धन्यवाद देत हैं हम आपका !

उ , नील कमल ✔️ लग गवा हमार नाम के आगे ! अब का बताई भैया ! 😁 गाना गये का मन करत है हमार ! सनबो का ? इ लेओ सुना “तू चीज़ बड़ी है musk musk … तू चीज़ बड़ी है, musk “

अधिक वाचा  पुणे पोलिसांना डॉ. घैसास पळून जाईल याची भीती घेतला ‘हा’ मोठा निर्णय?; रोज येथे हजेरी लावण्याचा सूचना

मायक्रो ब्लॉगिंग साईटरील ‘ब्लू टीक’ म्हणेजच निळा चेक मार्क हे एक चिन्ह आहे. जे खाते अधिकृत म्हणून सत्यापित केले गेले आहे असे दर्शवते. ‘ब्लू टीक’ हा चेक मार्क सार्वजनिक व्यक्ती, सेलिब्रिटी किंवा ब्रँडचे अधिकृत ट्विटर अकाऊंट दर्शवते आहे. निळा चेक मार्क खात्याची सत्यता प्रस्थापित करण्यास आणि तोतयागिरी किंवा ओळख चोरीला प्रतिबंध करण्यास मदत करते.

ट्विटरवर निळा चेक मार्क मिळवायचा असल्यास ट्विटर पडताळणी विनंती प्रक्रियेद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. तुमची ओळख आणि पडताळणीसाठी पात्रता सत्यापित करण्यासाठी ट्विटरला तुम्हाला अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्रे प्रदान करवी लागू शकतात. पडताळणी प्रक्रिया निवडक आहे आणि सर्व खाती पडताळणीसाठी पात्र नसतात. महत्त्वाचे असे की, निळा चेक मार्क हे ट्विटर खात्याच्या सामग्रीचे समर्थन किंवा सत्यापन नाही. ते फक्त सूचित करते की ट्विटर ने खातेधारकाची ओळख सत्यापित केली आहे.

अधिक वाचा  स्वत:च्या प्रॉपर्टीतून वाटताय का निधी? संतापलेल्या कोल्हेंनी अजितदादांना दिलं आव्हान…