मुंबई – राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. २०१९ च्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचे बिनसले आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणले.कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता अजित पवार यांनाही मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. त्यात भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजितदादाही मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केले आहे.

मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या वेळीस काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढले, राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या त्यावेळीही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही. राजकारणातील ही घटना सगळ्यांना माहिती आहे. दावा करणे आणि बहुमत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर बहुमताच्या बाजूने अजित पवार आले किंवा १०-२० वर्षांनी कधी त्यांना बहुमत मिळाले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुण्यात दाम्पत्याचा 7 वर्षांचा संसार 15 दिवसात संपुष्टात; यामुळेच 6 महिन्यांचा फेरविचार कालावधी का वगळला?

काय म्हणाले अजित पवार?
‘२०२४ मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, ‘२०२४ काय आत्ताही मुख्यमंत्री बनण्याची तयारी आहे. राज्याचा मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल असं विधान करून अजित पवार यांनी धमाल उडवून दिली आहे. मात्र, कोणत्या सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हायला आवडेल, हे मात्र पवार यांनी सांगितले नाही. त्यामुळे गुढता कायम आहे. भाजपा प्रवेशाविषयी कोणताही खुलासा पवार यांनी केला नाही.

२००४ साली संधी गेली राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असंही अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  मुंढर गावी कृषीदिनानिमित्त चारसूत्री भातशेती लागवड प्रात्यक्षिक व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न