अभिनेता आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर साहिल खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेला जीवेमारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावर साहिल खानविरोधात मुंबईत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या पत्नीनं ती तक्रार केली आहे. इतकंच काय तर त्याच्याविरोधात लैंगिक छळाचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. याशिवाय साहिलनं या पीडित महिलेचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तिच्याविषयी अश्लील पोस्ट शेअर केली असा आरोप केला आहे. तर या प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 43 वर्षीय महिलेला धमकी दिल्याप्रकरणी आणि सोशल मीडियावर तिच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी साहिल खान विरोधात एफआयआर दाखल केली आहे. एएनआय न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओशिवारा येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये जिमच्या पैशांवरून साहिल खान आणि पीडित महिलेचं भांडण झालं. त्यावर पुढे पीडित महिला म्हणाली की त्यानंतर साहिल खाननं माझा लैंगिक छळ केला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली.

अधिक वाचा  हिंजवडी फेज २च्या रहिवाशांची पीएमआरडीएकडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रार, कायमस्वरूपी उपायांची मागणी

पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही तक्राद दाखल केली. त्याविषयी सांगताना ते म्हणाले की, साहिल खान आणि एका महिलेविरोधात पीडित महिलेनं तक्रार केली आहे. इतकंच काय तर तिच्या कुटुंबाच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणात ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये कलम 500, 501, 509, 504आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी महिलेचे तक्रार दाखल करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत संबंध होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.