राज्यात यंदा हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत असल्याचं चित्र आहे. राज्यात यंदा हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत असल्याचं चित्र आहे.महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेने कहर केला आहे.

पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  तुझी ही जागा नाहीय…,मैदानात जसप्रीत बुमराह भिडला; सामना संपताच करुण नायर म्हणाला…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेची लाट

शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेचा पार चढताच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील किमान ४ दिवस मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यातील लोकांनी उन्हात घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक वाचा  टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

प्रमुख शहरांचे कमाल तापमान

अकोला ४४.०
अमरावती ४३.२
चंद्रपूर ४२.६
अहमदनगर ४२.४
वर्धा ४२.२
परभणी ४२.२
मालेगाव ४१.६
वाशीम ४१.५
गोंदिया ४१.५
नागपूर ४०.९
औरंगाबाद ४०.८
सोलापूर ४०.६
पुणे ४०.१
सातारा ३९.५

या ठिकाणी पाऊस, गारपिटीचा अंदाज

पुढील ४८ तासांत विदर्भातील अनेक शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर सांगली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

अधिक वाचा  कृषी क्षेत्रात स्मार्ट प्रकल्पाला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार

शाळांना सुटी

वाढत्या तापमानामुळे शासनाने राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुट्टी जाहीर केली आहे. विदर्भ वगळता इतर ठिकाणी आता सरळ 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. तसेच विदर्भातील जून महिन्यातील तापमानाचा विचार करता येथील शाळा ३० जूनपासून सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे