चंद्रपूर : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून व्यवसाय आणि व्यापार ठप्प आहे. अशात आता राज्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक बाबींमध्ये नागरिकांना सूट देण्यात आली आहे. अशात आता राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा आणि कोचिंग पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

कोविडचे सर्व नियम पाळून राज्यात एसटी सेवा सुरू करणार येणार असून एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा  गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये अखेर मिटलं भांडण; 8 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरू करण्याची तयारीही सरकार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. खरंतर, राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सगळंकाही बंद होतं. पण आता राज्यात व्यापार आणि ऑफिसं बऱ्यापैकी सुरू करण्यात आली आहेत. राज्य अनलॉक होताच पहिल्या टप्प्यात कोरोनाचा आकडा वाढलेला पाहायला मिळाला.

राज्यात विक्रमी संख्येने नवे रुग्ण आढळण्याचा क्रम शुक्रवारीही कायम होता. काल 12,608 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 364 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 5,72,734 एवढी झालीय तर मृत्यू संख्या 19,427वर पोहचली आहे. काल 10,484 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात 1,51,555 Active रुग्ण आहेत. तर 4,01,442 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.

अधिक वाचा  पवार गटाच्या जाहीरनाम्यातून घरगुती गॅस, सरकारी नोकऱ्यांबद्दल मोठं आश्वासन

मुंबईत सध्या 7 हजार कोविड पॉसिटीव्ह असलेल्या प्रभागांची संख्या 4 झाली आहे. अंधेरीत पाश्चिमेत एकूण 7017 कोरोनाबाधित आहेत. त्यानंतर रुग्णसंख्येनुसार के पूर्व, पी उत्तर, जी उत्तर आणि त्यानंतर के पश्चिमेचा समावेश होतो. सगळ्यात जास्त रुग्ण हे के पूर्व मध्ये 7895 आहेत तर पी उत्तर—7577, जी उत्तर 7453, तर के ईस्ट–7017 आहेत.