पुणे अर्बन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कर्वेनगर – वारजे परिसरातील भगिनींसाठी मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कचे मोफत प्रशिक्षण शिबीर

काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट, अंतरंगी डिजायनर्स आणि पुणे अर्बन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कर्वेनगर – वारजे परिसरातील भगिनींसाठी मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कचे मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात अनेक भगिनींनी उपस्थिती दर्शवत हा उपक्रम यशस्वी केला.

तब्ब्ल ४०० हून अधिक माता भगिनींनी आपल्या नावाची नोंदणी केली असून आरी वर्कचे प्रशिक्षण देणारे श्री. अभयजी भोसले यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवत येत्या तीस दिवसांत उत्तमोत्तम प्रशिक्षण देण्याचा शब्द दिला आहे. यावेळी १२० महिलांच्या चार बॅच तयार करण्यात आल्या असून त्याप्रत्येक बॅचमधुन ३० महिलांचा स्वतंत्र ग्रुप करण्यात आला आहे. प्रत्येक महिला भगिनीला उत्तम प्रशिक्षण मिळण्यासाठी कमी संख्येच्या बॅच तयार केल्या असून येत्या महिनाभरात या भगिनी लवकरच ही कला शिकून घेतील, यात शंकाच नाही.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटीका मातोश्री सौ. लक्ष्मीताई दुधाने, प्रशिक्षक श्री. अभयजी भोसले, श्री. योगेश माकणे सपत्नीक तर खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा मीनल ताई धनवटे, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माझे सर्व सहकारी, ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, अंतरंगी डिजायनर्स, पुणे अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने माता भगिनी याप्रसंगी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अयोजन स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाने यानी केले होते.

Hot this week

अखेर भाजपाचा विश्वास! प्रभाग १६ ‘अ’ मधून सौ. शिल्पा नितीन होले यांना AB फॉर्म, उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक...

आता ‘आका’सह टोळीला फाशीच, धनंजय देशमुख यांचा विश्वास वाढला, ज्ञानेश्वरी मुंडेंसाठी पण मैदानात उतरणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी...

रक्षाबंधन 2025 नक्की कधी? कन्फ्यूजन आजच दूर करा  8 की 9 ऑगस्ट नेमका शुभ दिवस, शुभ मुहूर्त, अचुक तिथी

  रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींमधील प्रेमाचे प्रतीक आहे. दरवर्षी हा...

Topics

अखेर भाजपाचा विश्वास! प्रभाग १६ ‘अ’ मधून सौ. शिल्पा नितीन होले यांना AB फॉर्म, उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक...

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण सरकारला झटका; ‘सर्वोच्च’चा निर्णय? नक्की काय घडले होते परभणीत?

परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू...

पुणे, मुंबईसह 7 बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय नामांकित बाजारतळा’चा दर्जा ‘ई-नाम’चीही प्रभावी अंमलबजावणी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र सुधारणा करण्याच्या...

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; अशी ‘स्थानिक’ची निवडणूक होईल? आराखडाही समोर… मग महापालिका!

महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img